Close

रॅपर रफ्तार दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात, फॅशन स्टायलिस्टशी बांधली लग्नगाठ (Rapper Raftaar Ties The Knot  With Fashion Stylist Manraj Jawanda In A Dreamy South Indian Ceremony)

रॅपर आणि संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायक रफ्तार त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. रफ्तारने दुसरे लग्न केले आहे त्याने फॅशन स्टायलिस्ट मनराज जावंदा यांच्याशी लग्न केले आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर, रफ्तारने शुक्रवार, ३१ जानेवारी रोजी मनराजशी गुपचूप लग्न केले. त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही सुंदर दिसत आहेत आणि पती-पत्नी म्हणून खूप आनंदी दिसत आहेत. रॅपर रफ्तार आणि मनचंदा यांच्या लग्नापूर्वीच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रफ्तारने त्यांच्या लग्नाचा कोणताही व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नसला तरी, हळदीपासून संगीतापर्यंतचे त्याचे फोटो समोर आले आहेत. हळदीच्या कार्यक्रमात, जोडप्याने पिवळे आणि पांढरे कपडे घातले होते, तर संगीत रात्री, तो त्याच्या वधूसोबत बहुरंगी पोशाखात नाचताना दिसला.

दोघांनीही दक्षिण भारतीय रितीरिवाजांनुसार लग्नाची शपथ घेतली आणि त्यादरम्यान ते खूप आनंदी दिसत होते. त्यांच्या लग्नाला फक्त त्यांचे कुटुंब, जवळचे नातेवाईक आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. रॅपरची दुसरी पत्नी मनराज जावंदा ही व्यवसायाने फॅशन स्टायलिस्ट आहे.

रफ्तारचे हे दुसरे लग्न आहे. त्याचे पहिले लग्न २०१६ मध्ये कोमलशी झाले होते. पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न केले, पण त्याचे लग्न जास्त काळ टिकले नाही. २०२० मध्ये त्याने घटस्फोटासाठी अर्ज केला आणि अखेर दोघेही वेगळे झाले.

Share this article