२५ जानेवारी रोजी संध्याकाळी, प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १३९ पद्म पुरस्कारांना मान्यता दिली, ज्यात सात पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री यांचा समावेश आहे. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये, पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात - पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. यावर्षी कला क्षेत्रातील ५१ व्यक्तींना हा सन्मान मिळाला.
यावर्षी छठ कोकिला शारदा सिन्हा आणि ओसामु सुझुकी यांच्यासह ७ व्यक्तिमत्त्वांना पद्मविभूषणाने सन्मानित करण्यात आले, तर पंकज उधास यांच्यासह १९ जणांना पद्मभूषण देण्यात आले. या वर्षी, अरिजित सिंग, नंदमुरी बालकृष्ण ते अशोक सराफ यांना पद्मश्रीसाठी निवडण्यात आले.
अशोक सराफ यांनी हा पुरस्कार जाहिर झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, "पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला हे ऐकून मी प्रचंड भावूक झालो आहे. मिळालेला सन्मान हा फक्त माझ्या कामाचा नाही, तर गेली अनेक वर्ष मला दिलेल्या प्रेक्षकांच्या प्रेमाचा आणि प्रेक्षकांच्या निःस्वार्थ पाठिंब्याचा आहे.
मी आजपर्यंत जे काम केले ते केवळ अभिनयाच्या आणि विनोदाच्या माध्यमातून लोकांचे हास्य आणि समाधान जपण्यासाठी केले. माझे कामातील सहकारी, माझे कुटुंबीय तसेच मला कामात प्रेरणा देणाऱ्या या क्षेत्रातील प्रत्येक कलाकाराला हा पुरस्कार मी समर्पित करतो आहे." अशोक सराफ यांनी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.