Close

खास पद्धतीने साजरी झाली ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोची पंचविशी, हॉट सीटवर २५ वर्षांनी बसले शोचे पहिले करोडपती (On KBC’s Jubilee Special, First Crorepati Harshvardhan Nawathe Returns To The Hot Seat)

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. बघता बघता या शोला सुरुवात होऊन कधी २५ वर्षे झाली हे कळलंच नाही. सध्या या शोमध्ये २५ वर्षाचं साजरीकरण सुरू आहे. दरम्यान, शोमध्ये कौन बनेगा करोडपती या शोचा पहिला करोडपती हर्षवर्धन नवाथे २५ वर्षांनी या शोमध्ये परत आला होता, ज्यामुळे लोकांचा उत्साह वाढला.

सोनी वाहिनीच्या अधिकृत अकाऊंटवर हर्षवर्धन नवाथेचा एक व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आला होता, ज्यामध्ये शो जिंकल्यानंतरच्या त्याच्या आयुष्याबद्दल सांगितले. शो जिंकून बराच काळ लोटला असला तरी आजही लोक त्याला केबीसी विजेता म्हणून ओळखतात, असे त्याने सांगितले.  

हर्षवर्धन नवाथे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “ही माझ्यासाठी घरी परतल्याची भावना आहे. २५ वर्षे हा खूप मोठा काळ आहे, २५ वर्षानंतर इथे येऊन मला खूप आनंद होत आहे. केबीसीने मला ओळख दिली, मला पैसे मिळाले, त्यासोबतच मला अनेक लोकांकडून प्रशंसा आणि प्रेम मिळाले. मी कधीच कल्पना केली नव्हती की एखादा शो जिंकल्यानंतर लोक तुम्हाला इतकी वर्षे लक्षात ठेवतील आणि तुम्हाला इतके प्रेम देतील.”

या व्हिडिओमध्ये त्यांनी शोमध्ये येणाऱ्या आणि पाहणाऱ्या लोकांना पुस्तके वाचण्याबद्दल आणि शोशी संबंधित इतर अनेक गोष्टींबद्दल सल्ला दिला. नवीन एपिसोड दरम्यान, हर्षवर्धनला त्याच्या जुन्या काळाची आठवण झाली. या दरम्यान, तो पहिला करोडपती झाला तो क्षण देखील दाखवण्यात आला.

Share this article