Close

अंकुश चौधरीने दिला कॉलेजच्या आठवणींना उजाळा, सवाईच्या विद्यार्थ्यांना खास शुभेच्छा ( Ankush Chaudhari Share His College Days Memories)

अभिनेता अंकुश चौधरीने त्याच्या कॉलेजच्या दिवसांना उजाळा देणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने लिहिले की, जिथून माझ्या आयुष्यातील दुनियादारीची खऱ्या अर्थाने सुरवात झाली आज तिथेच गेलो होतो. माझं MD कॉलेज. हल्ली एरियामध्ये जीव जास्त रमायला लागला आहे. गिरणगावातली ही नवीन मुलं जोरदार काम करते आहे. Md कॉलेजचा हा पोरगा हे करतो आहे, तिकडे ते करतो आहे त्याचं हे चालू आहे हे सतत कुठेना कुठे काम करत असताना कानावर ऐकू येत राहतं आणि दिल खुश होऊन जातो. कधी कोणे एके काळी एक ठिणगी टाकली असेल आणि आज बघता बघता त्याचा कधीही न विझणारा असा ज्वालामुखी तयार झाला आहे.

विचारांच्या साथीने बहारदार सादरीकरणा सकट नव्या युगाच्या नव्या मनोरंजनाची मशाल ही मंडळी घेऊन पुढे निघाली आहेत. म्हणून हल्ली माझ्या अस्सल दुनियेशी स्वतःला जोडून घेण्याचा पुन्हा प्रयत्न करतो आहे नवीन मित्र बनवतो आहे. ते जुने नाके आणि त्याच नाक्यावरची ही नवी पोरं मला ‘नवं’ असं काहीतरी शिकायला मदत करते आहे. मागून येणारी पिढी जबरदस्त आणि जोरदार पद्धत्तीने काही सांगू बघते आहे. ‘ब्रम्हपुरा’ हे नाटक तालीम स्वरूपात आज संध्याकाळी पाहिलं आणि आतून हलून गेलो. दोन हॅलोजनच्या प्रकाशत सर्व मंडळी नाटक सादर करत होती पण मी एकांकिकेत दाखवल्या गेलेल्या ब्रह्मपुरा गावी कधी पोहचलो माझं मलाच कळलं नाही.

स्पर्धेच्या गदारोळात नुसती झाक झुक न करता समाजभान जागरूक ठेवून ही माझ्या कॉलेजची मंडळी नाटक करतात ह्याचा आनंद वाटला. पोरांनो सवाईच्या अंतिम फेरीत जोरदार प्रयोग करा. आम्ही सगळे ताकदीनिशी तुमच्या मागे उभे आहोत. MD चे आले आले आले. (सवाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या सर्व एकांकिकांना माझ्या मनापासून शुभेच्छा!)

Share this article