थंडीचे दिवस आहेत. संध्याकाळच्या वेळेस वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम अन् कुरकुरीत पालक-पनीर भजी असेल तर क्या बात है. चला तर मग तयारीला लागूया.
साहित्य :
२ कप पालक (बारीक चिरलेला)
१-१ कप पनीर (छोटे छोटे तुकडे करा) आणि उकडून स्मॅश केलेले बटाटे
अर्धा कप चिरलेला कांदा
१/४ कप चिरलेली कोथिंबीर
३ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
आल्याचा एक तुकडा (किसून घेतलेला)
अर्धा कप बेसन
२-२ टेबलस्पून तांदळाचे पीठ आणि सफेद तीळ
१ लिंबाचा रस
मीठ चवीनुसार
अर्धा-अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर आणि ओवा
२ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
तेल आवश्यकतेनुसार
कृती :
तेल सोडून इतर सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्या.
मध्यम आकाराच्या भज्या बनवून गरम तेलात मंद आचेवर सोनेरी रंगात तळून घ्या.
तळायचे नसल्यास भज्यांवर ब्रशने तेल लावून एअर फ्रायर मध्ये १०-१२ मिनिटांपर्यंत शिजू द्या. हिरव्या चटणीसह सर्व्ह करा.