शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलेली जोडपी पन्नाशीच नव्हे तर वयाची साठी गाठेपर्यंत किंवा त्यानंतर सुद्धा, कामजीवनाचा आनंद घेतात. ऐन तारुण्यात असताना ज्या नियमितपणे त्यांनी लैंगिक सुख घेतले असते, तेवढे नाही तरी अधूनमधून ते हे सुख घेतात. सुखी आणि समाधानी जीवनासाठी लैंगिक सुख आवश्यक आहे. पद्धतशीर लैंगिक सुखाने स्त्री-पुरुषांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतात. पण हे सुख वेगवेगळ्या वयात वेगवेगळे असते. ऐन तारुण्यात असलेल्या कामसुखातला आवेग पुढे राहत नाही. त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. वयोमानानुसार शरीर थकते, गात्रे कमजोर होतात. तर कधी हार्मोन्सच्या बदलांचा कामभावनेवर परिणाम दिसून येतो. कधी मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांमुळे कामभावना कमजोर होते. सेक्स करण्याची इच्छा होत नाही. एवढे अपवाद वगळता वेगवेगळ्या वयात कामभावना वेगवेगळी असते. तेव्हा कोणत्या वयात, कामभावनेत कोणकोणते बदल होतात, ते पाहूया. किशोरवयात किशोरवयात सेक्स हार्मोन्सची पातळी वेगाने वाढत असते. यौवनाच्या उंबरठ्यावर असलेले हे वय असतं. या वयात सेक्सबाबत खूपशी उत्सुकता असते. मन अधीर झालं असतं. एकमेकांच्या स्पर्शानं अंगावर रोमांच उभे राहण्याचं हे वय असतं. वय स्वप्न बघण्याचं असतं. या वयात कामभावना निर्माण होत असतात. त्यामुळे सेक्स संदर्भात मनातल्या मनात चित्रे रंगविली जातात. स्वप्नात प्रणय, शृंगार सजविले जातात. स्वभावतः पुरुष आक्रमक असल्याने सेक्स करण्यात तो पुढाकार घेऊ सकतो. परंतु मुलगी मात्र फार तर चुंबन, आलिंगन यात समाधान पावू शकते. शारीरिक आकर्षणापेक्षा ती भावनिकदृष्ट्या आकृष्ट होत असते. कामभावनेपेक्षा मुलींमध्ये प्रेमभावना अधिक जागृत होत असते. मुलांमध्ये कामसुखाचे आकर्षण जबरी असते. ते मुलींच्या सहवासासाठी, स्पर्शसुखासाठी चरफडत असतात. ते न जमल्यास सिनेमातील प्रणयदृश्ये पाहून किंवा मित्रांशी सेक्ससंबंधी गप्पा मारून ते समाधान मिळवितात. मुलींना तर सिनेमातील प्रणयदृश्ये पाहणे, सिनेमातील नायकामध्ये आपला स्वप्नातील राजकुमार पाहणे यावर समाधान मिळविण्यात मोठा आनंद लाभतो. 20 ते 35 या वयात या वयात शरीर कामसुखासाठी तयार झाले असते. मन व शरीर त्या स्वर्गसुखासाठी अधीर झाले असते. कामपूर्तीसाठी मनाने उचल खाल्ली असते. त्यामुळे अंग उत्तेजित झाले असते. एकमेकांना स्पर्श करणे, अंगावरून हात फिरविणे, मिठी मारणे, चुंबन घेणे आदि कामक्रीडेशी संबंधित क्रिया कराव्याशा वाटतात. या क्रिया करण्याच्या भावनेने त्यांचे अंग गरम होते. याच्याही पुढे जाऊन समागम सुख घेण्याची त्यांची तयारी झालेली असते. तरुण मुलगे प्रणय-शृंगाराची स्वप्ने पाहू लागतात. जे प्रत्यक्षात करायला मिळत नाही, त्याच्या स्वप्नरंजनात ते दंग होतात. खरंतर तरुण मुलीसुद्धा अशाच मानसिक अवस्थेत असतात. पण त्यांचा केन्द्रबिंदू निव्वळ कामभावना एवढाच नसतो. आधी तिला आपल्या आवडत्या मुलाबरोबर वेळ घालवायला आवडतो. दोघांमध्ये प्रेमालाप करायला आवडते. नंतर मग प्रेमभावना जागृत होऊन ती मनापासून त्याच्यावर प्रेम करू लागते. एकमेकांचे प्रेम जुळले की नंतरच मग ती जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवण्यास तयार होऊ शकते. ही देखील एक शक्यताच असते. कारण अशा संबंधासाठी ती खुलेआम मागणी तर करू शकत नाही. किशोरवयापेक्षा तरुण वयात विचार करण्याची क्षमता वाढली असल्याने आपल्या कामवासना प्रकट करण्यात तरुणींना संकोच वाटतो. तसेच नीती-अनितीच्या कल्पना डोक्यात असल्याने आपली कामेच्छा प्रकट करण्यापेक्षा दाबून ठेवणे तिला सोयीचे वाटते. बव्हंशी तरुण मुली आपली कामेच्छा दाबून ठेवतात. मनास आवर घालतात. या वयोगटातील विवाहित तरुणींच्या भावना फारशा वेगळ्या नसतात. त्यांनी पतीकडून शरीरसुख भोगले असते, भोगत असतात. पण त्यांना स्वतःहून सुख हवे असले तर तशी पतीकडे मागणी करण्यात त्यांना संकोच वाटतो. त्यांना असं वाटतं की, आपल्या भावना-गरजा नवर्यानं समजून घ्याव्यात. तसं घडलं नाही तर त्या भावविवश होतात. क्वचित प्रसंगी त्यांना नैराश्य देखील येते. अनावर होत असलेल्या कामेच्छा दडपल्याने कधी कधी त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. तरुण-तरुणींचा स्वभाव चिडचिडा होतो. कामातील एकाग्रता कमी होते. मानसिक ताणतणाव वाढतात. विविध शारीरिक व मानसिक असंतुलन निर्माण होऊ शकते. विवाहित तरुणींना या वयातच गर्भधारणा होते. या अवस्थेसाठी त्या एकीकडे उत्सुक असतात. दुसरीकडे मात्र गर्भारपणाने त्यांचे कामजीवन संपुष्टात येते. शारीरिकदृष्ट्या व आरोग्याच्या दृष्टीने संभोगसुख घेण्याचे त्या टाळतात. त्यांचे लक्ष येणार्या बाळाकडे केन्द्रीत होते व कामेच्छा कमी होते. 30ते 50 या वयात या वयोगटातील स्त्री व पुरुष, अशी दोघांमध्येही कामेच्छा कमी झालेली आढळून येते. अपवादात्मक स्त्री-पुरुष असे आढळतात की, त्यांच्यात हा परिणाम दिसून येत नाही. ते कामसुख पूर्वीसारखेच घेताना आढळतात. ज्या स्त्री-पुरुषांमध्ये कामेच्छा कमी होते, ते भावनिकदृष्ट्या एकमेकांशी गुंततात. त्यांना शरीर मीलनापेक्षा मनोमीलनामध्ये आता रूचि वाटू लागते. एकमेकांची मने समजून घेण्यात, भावनांची कदर करण्यात यांची रूचि वाढते. ज्या जोडप्यांची कामेच्छा या वयोगटात शाबूत राहते, ते लैंगिक सुख अधिक चांगल्या प्रकारे घेतात. कारण तरुण वयापासून ते सुख घेतल्याने या प्रौढ वयात त्यांच्यामध्ये परिपक्वता आलेली असते. एकमेकांच्या आवडीनिवडींची माहिती त्यांना झालेली असते. त्यामुळे ते रसिकतेने कामसुख घेऊ लागतात. आधीपासून, सातत्याने कामसुख घेत असल्याने ज्या स्त्रियांमध्ये तरुण वयात संकोच असतो, तो या वयात निवळला असतो. त्यामुळे त्या कामसुखाबाबत आपल्या भावना प्रकट करू लागतात. काही विवाहित जोडप्यांच्या कामजीवनात या वयामध्ये परिवर्तन झालेलं दिसून येतं. ज्या स्त्रिया नोकरी, उद्योग करणार्या असतात, त्यांच्या व त्यांच्या नवर्याच्या करिअरमध्ये या वयोगटात चढता आलेख दिसून येतो. त्यांच्या नोकरी वा उद्योगधंद्याचा हा उत्कर्ष काल असल्याने ते कामात गर्क राहतात. परिणामी शरीर आणि मनाचा थकवा वाढतो. कामास वाहून घेतले असल्याने घरासाठी वेळ कमी उरतो. अशा काही कारणांनी कामजीवनातील रूचि कमी होते. आधीच सांगितल्याप्रमाणे याला काही अपवाद असतात. एका आरोग्यविषयक मासिकाने केलेल्या पाहणीत असं आढळून आलं आहे की, चाळीस किंवा त्याहून अधिक वयाच्या महिला त्यांचे कामजीवन अधिक चवीने उपभोगतात. पत्नीच्या इच्छेस मान देणारे व तिच्या कामतृप्तीमधून स्वतःदेखील तृप्तीचा आनंद घेणारे पती लाभले तर दोघांचेही कामजीवन सुखाचे व समाधानाचे राहते. आनंदाच्या या देण्याघेण्याने दोघांचीही शरीरं व मने तणावरहित राहतात. या वयोगटातील महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात. तसेच चाळीशीनंतर मासिक पाळी बंद होते. या कारणांनी त्यांच्या स्वभावात, वर्तणुकीत बदल आढळून येतात. चिडचिड होतो, अतृप्तीची भावना बळावते. मन सैरभैर होते. या सर्वांचा कामजीवनावर परिणाम होतो. पन्नाशीच्या पुढे पन्नाशी ओलांडली म्हणजे आपण वृद्ध होत चाललो आहोत, ही भावना स्त्री-पुरुषांमध्ये बळावते. आता आयुष्य उतरणीला लागले आहे, असे त्यांना (उगाच) वाटू लागते. आता सेक्स करायला नको, ही भावना बळावते. तो करणे सोडा, त्याचा विषय काढायला पण त्यांना नको वाटते. पन्नाशीच्या पुढे, साधारणपणे अशी माणसे, सासू-सासरे किंवा आजी-आजोबा झाले असतात. आता आपले कामसुख घेण्याचे दिवस राहिले नाहीत, असे वाटून ते स्वतःहून थांबतात. नाही म्हटलं तरी वय झाल्याने शरीरात पूर्वीसारखी शक्ती, जोम राहिला नसतो. या शारीरिक दौर्बल्यापायी आता लैंगिक सुख झेपणार नाही, या भीतीपोटी बरीचशी माणसे त्यापासून दूर राहतात. यालाही अपवाद आहेत. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलेली जोडपी पन्नाशीच नव्हे तर वयाची साठी गाठेपर्यंत किंवा त्यानंतर सुद्धा, कामजीवनाचा आनंद घेतात. ऐन तारुण्यात असताना ज्या नियमितपणे त्यांनी लैंगिक सुख घेतले असते, तेवढे नाही तरी अधूनमधून ते हे सुख घेतात. त्यासाठी शरीराबरोबरच मन आणि कामेच्छा निरोगी असायला लागते. ती असते म्हणूनच ते कामसुख घेतात नि मजेत राहतात.
Link Copied