Close

वयाच्या ५२ व्या वर्षी करण जोहर कोणाला करतोय डेट? अखेर सोशल मीडियावर ‘ती’ पोस्ट शेअर करत केला मोठा खुलासा (I Am Dating Instagram Finally Karan Johar Reveals Personal Life Status)

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. करण अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. करण फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. आता देखील करण याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्याने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल एक मोठी गोष्ट चाहत्यांना सांगितली आहे. करणने त्याच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं आहे.

करण याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एका पोस्ट केली आहे. ज्यामध्ये करणने डेटींगबद्दल सांगितलं आहे. पोस्ट शेअर करत करण म्हणाला, ‘मी इंस्टाग्रामला डेट करत आहे. इंस्टाग्राम माझं सर्वकाही ऐकतो… माझे स्वप्न पूर्ण करु देतो आणि माझे काही बिल्सपण भरतो. त्यामुळे इंस्टाग्रामवर प्रेम न करण्याचं कोणतंच कारण नाही…’ अशी पोस्ट करण याने केली आहे. सध्या सर्वत्र करणच्या या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, करणची खासियत म्हणजे तो स्वतःवर हसण्याच्या कलेत पारंगत आहे. करण कायम स्वतःवर विनोद करतो. सोशल मीडियावर देखील करण कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर करणच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी करण कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. पण अनेकदा करण याला ट्रोलींगचा देखील सामना करावा लागतो.

करण बद्दल सांगायचं झालं तर, २०१७ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून करण दोन मुलांचा पिता बनला. यश आणि रुही अशी त्याच्या मुलांची नावं आहेत. करण कायम मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.

Share this article