कार्तिक आर्यनला १० वर्षांनी इंजिनियरिंगची पदवी मिळाली, ज्याचा व्हिडिओ त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून अनेक कमेंट्स येत आहेत.
कार्तिक आर्यननेने यासंदर्भातला व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्याने लिहिले की, 'कॉलेजमध्ये मी शेवटच्या बाकावर बसायचो. मी बॅकबेंचर होतो आणि आज मी कन्व्होकेशनसाठी व्यासपीठावर उभा आहे. मी किती अद्भुत प्रवास केला आहे. तुम्ही मला खूप सुंदर आठवणी, स्वप्ने दिलात आणि आता अखेर मला पदवी मिळाली आहे. मला ही पदवी १० वर्षांनी मिळाली.
हा आनंद व्यक्त करताना तो म्हणाला की मला घरी आल्यासारखा वाटत होतं. कार्तिक आर्यननेही विद्यार्थ्यांसोबत डान्स केले. कार्तिक आर्यनच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट येत आहेत.
कार्तिक आर्यन शेवटचा भूल भुलैया या सिनेमात दिसला होता.