मुंबईच्या गुन्हेगारी जगताचे दर्शन घडविणारी ‘चिडिया उड’ ही नवी वेब सिरीज येत असून त्यामध्ये जॅकी श्रॉफ प्रमुख भूमिकेत चमकला आहे. सदर मालिका १५ जानेवारी पासून ॲमेझॉन एमएक्स प्लेयर वर मोफत दाखविण्यात येईल.
आबिद सुरती यांनी लिहिलेल्या अस्सल गुन्हेगारी कथांचे चित्रण यात असून हरमन बावेजा, विकी बाहरी यांनी निर्मिती केली आहे. दिग्दर्शन रवि जाधव यांचे आहे.
राजस्थानातून मुंबईत आलेल्या सहेर या तरुण मुलीची गुन्हेगारी विश्वात झालेली फरपट व तिचा संघर्ष याची कथा या मालिकेत आहे. हे पात्र भूमिका मीना हिने साकारले असून जॅकी श्रॉफ कादिर खान हे पात्र करत आहे.
“हे पात्र साकारण्याचे आव्हान होते. पण मला ते सन्मानाचे वाटले. या कथेत प्रत्येक पात्र जगण्यासाठी संघर्ष करतो,” असे जॅकीने सांगितले. तर “सेहरचे पात्र साकारणे हे माझ्यासाठी अविश्वसनीय होते. निर्दयी गुन्हेगारी जगतातील संकटांचा सामना ती धीराने करते व तिच्यातील शक्तीने त्यावर मात करते,”असे भूमिकाने सांगितले.