झी मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेत अभिनेत्री अक्षया हिंदळकर प्रमुख भूमिका साकारत आहे. नुकताच तिने तिच्या आयुष्यात घडलेला अपघात शेअर केला.
अक्षया म्हणाली की, दीड वर्ष मला चालता येत नव्हतं...त्यामुळे हातातून मालिका निसटली"... अभिनेत्री अक्षया हिंदळकर सध्या झी मराठीच्या 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. नुकतीच तिने तिच्या अपघाताबद्दल एक आठवण शेअर केली आहे. "मी एक मराठी मालिका केली होती. या मालिकेमुळे मला चांगली लोकप्रियता मिळाली. त्यानंतर मी हिंदीत नशीब आजमावण्याचे ठरवले. ऑडिशन दिल्यानंतर माझं सिलेक्शन झालं.
शूटिंगच्या दिवशी मला साडी नेसायची होती त्यामुळे तीन दिवस अगोदर शिवलेला ब्लाउज घेण्यासाठी मी माझ्या स्कुटीने जात होते. सिग्नलवर एक वृध्दव्यक्ती रोड ओलांडत होती, माझी गाडी स्पीडमध्ये असल्याने त्यांना वाचण्यासाठी मी माझी गाडी वळवली आणि अपघात झाला. या अपघातामुळे मी दीड वर्ष चालू शकत नव्हते. मालिका तर हातातून निसटलीच होती त्यामुळे नैराश्य आलं. यादरम्यान आई वडिलांनी माझी खूप काळजी घेतली. मला बाथरूम पर्यंत जाता येत नव्हतं, आईला मला उचलता येत नव्हतं तेव्हा वडीलच मला तिथपर्यंत उचलून घेऊन जायचे. त्यानंतर मला त्यांचं महत्व जास्त कळायला लागलं.
या डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मला साथ दिली. आज शूटिंग चालू असलं तरी आईचा फोन कितीही वेळा आला तरी मी हसूनच तिच्याशी बोलते. मालिकेत मी आईची भूमिका करत आहे त्यामुळे आई असणं काय असतं ते मला कळायला लागलं आहे.