Close

‘पिरॅमिड’ या नव्या वेब सिरीजमध्ये क्रिप्टोकरन्सी आणि गुन्हेगारी विश्वाचे चित्रण (New Web Series ‘Pyramid’ Has A Background Of Crypto Currency And Crime World)

क्रिप्टोकरन्सी आणि गुन्हेगारीच्या गूढ विश्वाचे रोमांचक पार्श्वभूमी असलेली ‘पिरॅमिड’ ही नवी वेब सिरीज हंगामा ओटीटी मंचावर प्रदर्शित होत आहे.

हेली शाह, रोहन मेहरा, हर्षद अरोरा, करण शर्मा आणि क्रिसन बरेटो या प्रतिभावान कलाकारांच्या सहभागाने सजलेली ही वेब सिरीज अर्जुन बॅनर्जी यांच्या खळबळजनक हत्येचा तपास उलगडते. अर्जुन हा पिरॅमिड नावाच्या नाविन्यपूर्ण क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्मचा निर्माता आहे. त्याच्या अचानक मृत्यूमुळे लाखो लोकांचे खाते ब्लॉक झाले असून उत्तरांच्या शोधात देश अस्वस्थ झालेला आहे.

पत्रकार वृंदा (हेली शाह) या घटनेतील सत्य शोधण्यासाठी तपास करत असते. या तपास प्रवासात तिला फसवणुकीच्या जाळ्यातील छुपे हेतू, विश्वासघात आणि अनेक रहस्यांचा सामना करावा लागतो. तिचा सत्यशोध तिला एका धोकादायक मार्गावर नेत असतो, जिथे प्रत्येक वळणावर धोका असतो आणि प्रत्येक गोष्ट तितकी सोपी नसते जितकी ती दिसते.

हंगामा डिजिटल मीडियाचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक नीरज रॉय म्हणाले की, "पिरॅमिड ही हंगामाच्या ओरिजिनल कंटेंट पोर्टफोलिओ कंटेंटमध्ये भर घालणारी आणि एका महत्त्वाच्या विषयाला एका थरारक कथानकासोबत जोडणारी एक महत्त्वपूर्ण निर्मिती आहे. क्रिप्टोकरन्सी जागतिक अर्थव्यवस्थेला नवा आकार देत असताना, ही मालिका त्याच्या गडद बाजूंवर प्रकाश टाकते आणि प्रेक्षकांना एक रोमांचक अनुभव देते."

पिरॅमिडचे दिग्दर्शक नितीश सिंग यांनी आपल्या दृष्टीकोनाबद्दल सांगितले की, "पिरॅमिडचे दिग्दर्शन हा एक अद्भुत प्रवास ठरला आहे. ही वेब सिरीज एका वेगाने बदलणाऱ्या डिजिटल जगाच्या पार्श्वभूमीवर मानवी लालसा, विश्वासघात आणि जिद्दीच्या संकल्पनांचे बारकाईने परीक्षण करते. प्रत्येक पात्र हे बहुपेडी असून ते आपल्या भूमिकेने कथानकाला समृद्ध करते आणि प्रेक्षकांना या गुंतागुंतीच्या व थरारक जगातील अनेक पदर उलगडण्यास प्रवृत्त करते. मला विश्वास आहे की प्रेक्षक या आकर्षक प्रवासाचा आनंद घेतील."

अर्जुनचे पात्र साकारलेले हर्षद अरोरा यांनी सांगितले की, "पिरॅमिडचा भाग असणे हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव ठरला आहे. अर्जुनचे पात्र रहस्याच्या केंद्रस्थानी असून त्याची कथा महत्वाकांक्षा, नावीन्य आणि त्याच्या अकाली मृत्यूनंतरच्या गोंधळाची आहे. मला विश्वास आहे की प्रेक्षकांना त्याच्या जीवन आणि वारशाभोवतीचे रहस्य आणि गुंतागुंतीचे पैलू खूप भावतील."

क्रिसन बरेटो यांनी आपल्या भूमिकेबद्दल सांगितले की, "पिरॅमिडने मला अनिश्चितता आणि धोका यांनी भरलेल्या जगात जगणाऱ्या एका नकारात्मक व आव्हानात्मक पात्रामध्ये  डुंबण्याची संधी दिली. वेब सिरीजमधील गुन्हेगारी थराराचा पैलू खरोखरच वेगळा ठरत असून आम्ही जीव तोडून साकारलेले हे रहस्य व नाट्यमय वळणांनी भरलेले कथानक उलगडताना पाहणे प्रेक्षकांसाठी रोमांचक असेल."

करण शर्मा यांनी सांगितले की, "पिरॅमिडमधील तंत्रज्ञान आणि गुन्ह्यातील एकसंधता एक रोमांचक आणि विचाराला चालना देणारी वेगळी कथा साकारते. या प्रकल्पाचा भाग होणे खूप समाधानकारक होते, आणि प्रेक्षक मालिकेतील खिळवून ठेवणारी नाट्यमय वळणे व ट्विस्ट नक्कीच एन्जॉय करतील."

Share this article