अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी आणि तिचा पती शानवाझ शेख हे एका मुलाचे पालक झाले आहेत. १८ डिसेंबर रोजी या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. देवोलीनाने सोशल मीडियावर चाहत्यांना खुशखबर दिली.
तिने एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, 'आमचं बंडल ऑफ जॉय, १८ डिसेंबर रोजी आमच्या आयुष्यात एका मुलाचे आगमन झाले याची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.' या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हॅलो वर्ल्ड! आमचा छोटा देवदूत मुलगा आला आहे...१८/१२/२०२४.
देवोलिनाने २ वर्षांपूर्वी शहनवाझशी लग्न केले होते. त्यावेळी मुस्लिम मुलासोबत लग्न केले म्हणून तिला खूप ट्रोल केले होते. पण नंतर जेव्हा तिने गरोदरपणाची घोषणा केली तेव्हा सगळे खूश झाले आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करु लागले.