साहित्य: 250 ग्र्रॅम भोपळी मिरची, 2 उभे चिरलेले कांदे, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 2-3 हिरव्या मिरच्या, 3 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून कसुरी मेथी, मीठ चवीनुसार, चिरलेली कोथिंबीर व बटर. कृती: भोपळी मिरची उभी व लांब कापून घ्या. कढईत तेल गरम करून लसूण, हिरवी मिरची व कांदा टाकून परतून घ्या. चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्या. हळद, मीठ, लाल मिरची पूड, चाट मसाला, कसुरी मेथी टाका. आता यात भोपळी मिरची टाकून 2-3 मिनिटे शिजवा. बटर घालून कोथिंबिरीने सजवा.
Link Copied