Close

आजादच्या रिलीजपुर्वी अमन देवगण, राशा थडानी यांनी वाराणसीला केली गंगा आरती (Aaman Devgan, Rasha Thadani Perform Ganga Aarti In Varanasi Ahead Of Azaad Movie Release)

राशा थडानी, अमन देवगन आणि चित्रपट दिग्दर्शक अभिषेक कपूर त्यांच्या आगामी 'आझाद' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वाराणसीला पोहोचले होते. यावेळी तिघांनी मिळून देवाचे दर्शन घेतले व काशी विश्वनाथ मंदिरात गंगा आरती केली.

राशा थडानी, अमन देवगण आणि चित्रपट निर्माता अभिषेक कपूर त्यांच्या आगामी 'आझाद' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वाराणसीला पोहोचले होते. यावेळी तिघांनी मिळून देवाचे दर्शन घेतले व काशी विश्वनाथ मंदिरात गंगा आरती केली.

चित्रपट दिग्दर्शक अभिषेक कपूर दिग्दर्शित 'आझाद' चित्रपटातील 'बिरंगे…' हे गाणे चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत आहे. जयपूर आणि प्रयागराजमधील चाहत्यांचा जबरदस्त आणि अप्रतिम प्रतिसाद मिळाल्यानंतर, अभिषेक कपूर, अमन देवगण आणि राशा थडानी यांनी वाराणसीला आध्यात्मिक भेट दिली.

आपला आनंद व्यक्त करताना दिग्दर्शक अभिषेक कपूर म्हणाले- वाराणसीमध्ये गंगा आरती पाहून, त्यात सहभागी होऊन काशी विश्वनाथाचा आशीर्वाद घेऊन मी खूप कृतज्ञ आहे. माझ्यासाठी हे वर्तुळ पूर्ण करण्यासारखे आहे. केदारनाथचे दर्शन घेतल्यानंतर आता महादेवाच्या आशीर्वादाने आझादसोबत आणखी एक अध्याय सुरू होत आहे.

अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगणसोबत डायना पेंटी देखील आहेत. रॉनी स्क्रूवाला आणि प्रज्ञा कपूर यांनी बनवलेल्या या चित्रपटाने प्रेम आणि निष्ठेचा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

हा चित्रपट नवीन वर्षाच्या मुहूर्तावर 17 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Share this article