Close

‘कल्की २८९८-एडी’ हा चित्रपट व ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ या वेब सिरीजने पटकावला २०२४ सालच्या लोकप्रियतेमध्ये अव्वल नंबर : ‘आयएमडीबी’ने प्रदर्शित केली पहिल्या १० कलाकृतींची यादी (‘Kalki 2898-AD’ Film And ‘Hiramandi : The Diamond Bazar’ Web Series Toppers The List Of 10 Most Popular Films And Web Series Of 2024: IMDb Declares The Result)

IMDb (www.imdb.com)  ह्या मूव्हीज, टीव्ही शोज व सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत लोकप्रिय व विश्वसनीय स्रोताने २०२४ मध्ये जगभरातील IMDb ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या १० भारतीय मूव्हीज व १० वेब सिरीजची यादी घोषित केली आहे. IMDb च्या वर्षाच्या शेवटी येणाऱ्या यादीचे निर्धारण जगभरामध्ये दर महिन्याला काय बघावे हे शोधण्यासाठी IMDb वर येणाऱ्या २५ कोटींहून अधिक दर्शकांच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार केले जाते.

“IMDb च्या २०२४ च्या सर्वांत लोकप्रिय भारतीय चित्रपट व वेब सिरीजची यादी केवळ वर्षातील आघाडीच्या टायटल्सना सेलिब्रेट करते इतकेच नाही‌ तर दर्शक कशाला प्राधान्य देतात, ह्याबद्दलसुद्धा महत्त्वाची माहिती देते. त्यामुळे ती निर्माते व चाहते दोघांनाही मनोरंजनासंदर्भात अनेक पर्याय उपलब्ध करून देते,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया ह्यांनी म्हटले. “क्र. १ चा चित्रपट कल्की 2898-एडी ह्या अतिशय बिग बजेट कलाकृतीपासून ते क्र. १० वरील लापता लेडीज ह्या थरारक नाट्यापर्यंत व लोकांना आवडणाऱ्या फ्रँचायजीच्या पुनरागमनापासून विलक्षण अशा ओरिजिनल मालिकांपर्यंत ह्या याद्यांमध्ये जगभरातील श्रोत्यांना खिळवून ठेवणाऱ्या भारतातील कथा मांडणीची अविश्वसनीय व्याप्ती समोर आली आहे.”

२०२४ च्या IMDb टॉप १० सर्वांत लोकप्रिय भारतीय चित्रपटांची यादी

1.         कल्की 2898-एडी

2.         स्त्री 2: सरकटे का आतंक

3.         महाराजा

4.         शैतान

5.         फायटर

6.         मंजुमेल बॉयज

7.         भूल भुलैया 3

8.         किल

9.         सिंघम अगेन

10.       लापता लेडीज

2024 च्या IMDb टॉप 10 सर्वांत लोकप्रिय भारतीय वेब सिरीजची यादी

1.         हीरामंडी: द डायमंड बाजार

2.         मिर्झापूर

3.         पंचायत

4.         ग्यारह ग्यारह

5.         सिटाडेल : हनी बनी

6.         मामला लीगल है

7.         ताज़ा खबर

8.         मर्डर इन माहिम

9.         शेखर होम

10.       द ग्रेट इंडीयन कपिल शो

Share this article