दुधी कोफ्ते
साहित्य: 150 ग्रॅम किसलेला दुधी, 2 टेबलस्पून बेसन, 1 टीस्पून हिरवी मिरची, 1 टीस्पून किसलेले आलं, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड व धणे पूड, पाव टीस्पून हळद, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल, मीठ चवीनुसार.
गे्रव्हीसाठी: 2 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून राई- जिरे, 2 टेबलस्पून किसलेले खोबरे, 1 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे, 100 ग्रॅम दही, मीठ चवीनुसार, प्रत्येकी 1 टेबलस्पून बेसन, लाल मिरची पूड व धणे पूड, मीठ चवीनुसार.
कृती: कोफ्त्याचे सर्व साहित्य एकत्र करून गोळे बनवा. तेल गरम करून मंद आचेवर हे गोळे खरपूस तळून घ्या.
ग्रेव्हीसाठीः खोबरे व शेंगदाण्यात थोडेसे पाणी टाकून वाटून घ्या. दही व बेसनाचे मिश्रण बनवा. दह्याच्या मिश्रणात
2 कोफ्ते कुस्करून घाला. 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात राई, जिरे व खोबर्याचे वाटण घालून परता. नंतर यात दह्याचे मिश्रण घालून मोठ्या आचेवर शिजवा. आता सर्व मसाले व कोफ्ते घालून मंद आचेवर शिजवा. गरम-गरम सर्व्ह करा.
सोया मेथी
साहित्य: 1 बारीक चिरलेली मेथी, 1 कप सोया ग्रॅन्युल्स, 2 टेबलस्पून तेल, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट, 10-12 काजू, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून हळद, 2 टीस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा कप दूध, मीठ चवीनुसार.
कृती: सोया ग्रॅन्यूल्स गरम पाण्यात 15 मिनिटे भिजत ठेवा. नंतर त्यातील पाणी काढून टाका. एका पॅनमध्ये तेल गरम करून चिरलेला कांदा घालून परता. आलं-लसूण पेस्ट घालून परता. मेथी घालून त्यातील पाणी सुके पर्यंत शिजवा. काजुमध्ये थोडेसे पाणी घालून वाटून पेस्ट बनवा. ही पेस्ट मेथीत घालून परता. सोया ग्रॅन्युल्स, लाल मिरची पूड, हळद, धणे पूड, गरम मसाला व मीठ घाला. दूध व थोडेसे पाणी घालून शिजवा. गरम गरम सर्व्ह करा.