Close

पेशावरी चणा (Peshawari Chana)

साहित्यः 1 कप काबुली चणे, 1 टीस्पून गरम मसाला, अर्धा कप चिरलेला कांदा, 1 तमालपत्र, पाऊण कप बारीक चिरलेले टोमॅटो, मीठ चवीनुसार, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 2 टेबलस्पून एव्हरेस्ट धणे पूड, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून चना मसाला, 2 टीस्पून चहा पावडर, 2 मधोमध चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून आलं पेस्ट, 1 टेबलस्पून लसूण पेस्ट, 2 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून एव्हरेस्ट चणा मसाला, 1 टीस्पून जिरे पूड.
कृतीः काबुली चणेे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. एका छोट्या रुमालात चहा पावडर बांधून चण्यात ठेवा. कुकरमध्ये चणे शिजवून घ्या. थंड झाल्यावर पाणी निथळून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून तमालपत्र व कांदा टाकून परतून घ्या. आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची टाकून परतून घ्या. चिरलेले टोमॅटो, लाल मिरची पूड, धणे पूड, हळद, मीठ, एव्हरेस्ट चणा मसाला व जिरे पूड टाकून परता. 1 कप पाणी टाकून शिजवा. नान किंवा कुलचा सोबत गरम-गरम सर्व्ह करा.

Share this article