Close

हिमाचली भाजी (Himachali Vegetables)

साहित्यः टोमॅटो ग्रेव्हीसाठीः 100 ग्रॅम टोमॅटोची पेस्ट, 50 ग्रॅम काजूची पेस्ट, 50 मि.ली. क्रीम, 20 ग्रॅम मावा, 20 ग्रॅम चीज, गाजर, फरसबी, मटार, फ्लॉवर, मशरूम, पनीर, 1 टेबलस्पून तेल व मीठ चवीनुसार.
पालक ग्रेव्हीसाठीः 100 ग्रॅम पालक प्युरी, 50 ग्रॅम काजूची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट, चिरलेली हिरवी मिरची, मिक्स भाज्या, कांदा व मीठ चवीनुसार, सजावटीसाठी क्रीम, मटार, कोथिंबीर व किसलेले चीज.
कृतीः टोमॅटो ग्रेव्हीः भाज्यांव्यतिरीक्त टोमॅटो ग्रेव्हीचे सगळे साहित्य एकत्र करून सुकेपर्यंत परतून घ्या. यात भाज्या टाकून शिजवून घ्या.
पालक ग्रेव्हीः कांदा सोनेरी खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. यात पालक प्युरी टाकून दोन मिनिटे शिजवा. यात काजूची पेस्ट व सगळ्या भाज्या टाकून ग्रेव्ही घट्ट होईपर्यंत शिजवा. दोन्ही भाज्या वेगळ्या दिसण्यासाठी प्लेटमध्ये एका बाजूला टोमॅटो ग्रेव्ही ठेवून मधोमध कोबीची पाने ठेवून पालक ग्रेव्ही ठेवा. क्रीम, मटार, कोथिंबीर व किसलेल्या चीजने सजवून सर्व्ह करा.

Share this article