२०२४ मध्ये 'या' सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात अनेक अडचणी आल्या. कोणाचं झालं ब्रेकअप तर कोणाचा घटस्फोट... झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात.
अनेक लोकं त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींना आदर्श मानत असतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात. पण २०२४ मध्ये अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी जोडीदारासोबत ब्रेकअप तर काहींनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आज आपण अशाच काही सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊया…
ऐश्वर्या रजनीकांत आणि धनुष : साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांनी सोशल मीडियावर अधिकृतपणे घोषणा केली होती की ते दोघे आता वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या आणि धनुषचं लग्न २००४ मध्ये झालं होतं. मात्र, १८ वर्षे एकत्र राहिल्यानंतर ते वेगळे झाले आहेत.
ए.आर. रेहमान आणि सायरा बानू : लग्नाच्या २९ वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. खुद्द ए. आर. रेहमान यांनी सोशल मीडियावर पत्नीपासून विभक्त होत असल्याची अधिकृत घोषणा केली. ए.आर. रेहमान आणि सायरा बानू यांचं लग्न १९९५ मध्ये झालं होतं.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांनी या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी २०२४ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटानंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले.
हार्दिक पंड्या आणि नताशा स्टेनकोविक : २०२४ वर्षाच्या सुरुवातीपासूनत हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. लग्नाच्या ४ वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सतत रंगणाऱ्या चर्चांनंतर दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोटाची घोषणा केली.
ईशा देओल आणि भरत तख्तानी : हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचाही याच वर्षी घटस्फोट झाला आहे. लग्नाच्या ११ वर्षानंतर दोघे वेगळे झाले. मात्र, त्यांच्या विभक्त होण्याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर : २०१९ मध्ये अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी सर्वांसमोर प्रेमाची कबुली दिली होती. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मलायका – अर्जुन यांचं ब्रेकअप झालं.