जेवणात काही खास बनवायचे असेल तर हा स्वादिष्ट ओनियन कॅप्सिकम टिक्का जरूर करून पाहा -
साहित्य:
प्रत्येकी १-१ कांदा आणि सिमला मिरची (मोठे तुकडे)
१ टीस्पून जिरे
कसुरी मेथी, हिंग आणि तिखट प्रत्येकी अर्धा चमचा
मॅरीनेशनसाठी:
२ चमचे ताजे दही
प्रत्येकी अर्धा चमचा हळद, तिखट, कसुरी मेथी, गरम मसाला पावडर, धने पावडर, जिरे पावडर.
१-१ टीस्पून बेसन आणि तेल
चवीनुसार मीठ
कृती :
मॅरीनेशनचे साहित्य व्यवस्थित एकत्र मिसळा.
कांदा आणि सिमला मिरची मॅरीनेट करून ५ मिनिटे ठेवा.
कढईत तेल गरम करून त्यात जिरे, तिखट, हिंग आणि कसुरी मेथी घाला.
मॅरीनेट केलेला कांदा आणि सिमला मिरची घालून मिक्स करा. १ कप पाणी घालून उकळू द्या.
झाकण ठेवून शिजवा.
ग्रेव्ही घट्ट झाल्यावर गॅसवरून काढून टाका.
भाताबरोबर सर्व्ह करा.