हृतिक रोशनने सोशल मीडियावर द रोशन्स नावाच्या मालिकेची घोषणा केली आहे. ही मालिका रोशन कुटुंबावर आधारित आहे. रोशन कुटुंबाचे हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान या मालिकेत दाखवण्यात आले आहे. ही एक डॉक्यू-सीरीज आहे, ज्यामध्ये रोशन लाल नागरथ, राजेश रोशन, राकेश रोशन आणि हृतिक रोशन यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
रोशन कुटुंबाची डॉक्यू-सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केली जाईल. या मालिकेद्वारे लोकांना रोशन कुटुंबाविषयी जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. या मालिकेत कुटुंबातील संघर्ष आणि यशाबद्दल सांगितले जाते. आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्टर शेअर करताना नेटफ्लिक्सने लिहिले की, 'म्युझिक, मॅजिक आणि हिंदी सिनेमात उत्तम काम करणाऱ्या कुटुंबाचा प्रवास दाखवण्याची संधी मिळाली हे खूप छान वाटतं. हा कौटुंबिक वारसा आणि प्रेम आहे. नेटफ्लिक्सवर लवकरच ‘द रोशन्स’ पहा.
हृतिक रोशननेही डॉक्युमेंट-सीरिजचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून आनंद व्यक्त केला आहे. मात्र, या मालिकेची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. असे मानले जात आहे की ही मालिका हृतिकच्या वाढदिवसाला म्हणजेच १० जानेवारीला रिलीज होऊ शकते. या मालिकेत रोशन कुटुंबाशिवाय इंडस्ट्रीतील अनेकांच्या मुलाखतीही पाहायला मिळणार आहेत.
रोशन्स सीरिजचे दिग्दर्शन शशी रंजन यांनी केले आहे. राकेश रोशन यांनी या मालिकेची सहनिर्मिती केली आहे. तर वृत्तानुसार, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा जोनास आणि विकी कौशलचे वडील शाम कौशल देखील या माहितीपट मालिकेत दिसणार आहेत.