साहित्यः मोठी मिरची.
शेंगदाण्याची ग्रेव्हीः 100 ग्रॅम शेंगदाण्याची पेस्ट, 20 ग्रॅम आलं-लसूण पेस्ट, 20 ग्रॅम अख्खा गरम मसाला, प्रत्येकी 20 ग्रॅम जिरे पूड, हळद, धणे पूड व एव्हरेस्ट चाट मसाला, 50 ग्रॅम राई तेल, मीठ चवीनुसार.
स्टफिंगसाठीः 50 ग्रॅम शेंगदाणे, 50 ग्रॅम पनीर, प्रत्येकी 10 ग्रॅम जिरे पूड, धणे पूड, गरम मसाला, हिरवी मिरची, चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य एकत्र करून भाजून घ्या.
कृतीः कढईत तेल गरम करून त्यात आलं-लसूण पेस्ट टाकून परतून घ्या. यात शेंगदाण्याची पेस्ट व गरम मसाला टाका. थोडा वेळ परतून हळद, जिरे पूड, धणे पूड व एव्हरेस्ट चाट मसाला टाका. एक कप पाणी व मीठ टाका. ग्रेव्ही घट्ट होईपर्यंत शिजवा. मिरचीत स्टफिंगचे साहित्य भरून मिरची डीप फ्राय करा. तळलेल्या मिरच्या ग्रेव्हीमध्ये टाका. राईचे तेल व कोथिंबिरीने सजवून गरम-गरम सर्व्ह करा.
मिरचीचा रस्सा (Chilli Rassa)
Link Copied