कॅप्सिकम विथ पनीर
साहित्य: 200 ग्रॅम पनीर, 1 भोपळी मिरची, अर्धा कप टोमॅटो प्युरी, 1 कांद्याची पेस्ट, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून बारीक चिरलेला पुदिना.
कृतीः पनीर व भोपळी मिरची लांब व पातळ कापून घ्या. टोमॅटो प्युरी, कांद्याचा रस, कोथिंबीर, पुदिना व मीठ टाकून 2 मिनिटे शिजवा. भोपळी मिरची टाकून शिजवा. आता यात पनीरचे तुकडे टाकून झाकण लावून शिजवा. गरज असल्यास थोडेसे पाणी टाका. कोथिंबीर व भोपळी मिरचीने सजवून सर्व्ह करा.
बीन्स विथ पनीर
साहित्यः 175 ग्रॅम चवळी, 200 ग्रॅम पनीर, 1 कप फरसबी, गाजर, पातीचा कांदा, मटार, 1 छोटा कांदा, 1 टेबलस्पून टोमॅटो केचअप, 2 टीस्पून तेल, मीठ चवीनुसार, अर्धा टीस्पून जिरे, सजावटीसाठी कोथिंबीर.
कृतीः चवळी रात्रभर भिजत ठेवा. दुसर्या दिवशी चवळी प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्या. फरसबी थोडीशी वाफवून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून जिर्याची फोडणी द्या. त्यात कांदा, पातीचा कांदा, भोपळी मिरची, गाजर, मटार, फरसबी व चवळी टाका. मीठ व पनीर घाला. टोमॅटो केचअप घालून कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.