Close

भेंडी प्याज आणी गट्ट्याची भाजी (Bhendi Onion And Gattayachi Bhaji)

भेंडी प्याज
साहित्यः 250 ग्रॅम भेंडी, प्रत्येकी 1 टीस्पून राई, कापलेली लसूण, आलं, 1 टेबलस्पून दही, चिमूटभर हिंग, 1 कांदा, अर्धा टीस्पून गरम मसाला 1 टोमॅटो, थोडेसे किसलेले खोबरे, 3 टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ.
कृतीः भेंडी कापून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून राई टाका. राई तडतडल्यानंतर हिंग, कापलेले आलं, लसूण, कांदा, टोमॅटो व दही घालून परतून घ्या. भेंडी टाकून मंद आचेवर 7-8 मिनिटे शिजवा. किसलेल्या खोबर्‍याने सजवून सर्व्ह करा.

गट्ट्याची भाजी
साहित्यः गट्टे बनवण्यासाठीः 100 ग्रॅम बेसन, 2 टीस्पून तेल, अर्धा टीस्पून मीठ, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,
1 टेबलस्पून कोथिंबीर, 1 टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड, पाव टीस्पून हळद.
मसाल्यासाठीः 2 टेबलस्पून भाजलेले बेसन, 200 ग्रॅम दही, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल मिरची पूड, 1टेबलस्पून तेल, 2 टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, 2 तमालपत्र, 2 टीस्पून जिरे, 2 टीस्पून ओवा, मीठ चवीनुसार, 1 टेबलस्पून कोथिंबीर.
कृतीः गट्टे बनवण्याचे साहित्य एकत्र करून पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घ्या. याचे रोल बनवून घ्या. हे रोल
20 मिनिटे वाफवून घ्या. थंड झाल्यावर छोटे-छोटे तुकडे करून घ्या. दह्यात बेसन टाकून मिश्रण बनवून घ्या. पॅॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे व तमालपत्र टाका. दह्याचे मिश्रण टाका. सगळे मसाले व गट्टे टाकून 10 मिनिटे मंद आचेवर शिजवा. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.

Share this article