साहित्य: 2 भोपळी मिरच्या, 100 ग्रॅम मक्याचे दाणे, 2 मोठे कांदे, 2 मोठे टोमॅटो, प्रत्येकी 1 टीस्पून सुक्या लाल मिरच्यांची पेस्ट व आलं-लसूण पेस्ट, चिमूटभर हळद, 1 टेबलस्पून तेल, 2-3 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून जिरे पूड व मीठ चवीनुसार.
कृती: मक्याचे दाणे उकडून घ्या. भोपळी मिरची लांब कापून तळून घ्या. कांदा व टोमॅटो वेगवेगळे मिक्सरमधून वाटून घ्या. कढईत तेल गरम करून आलं-लसूण पेस्ट टाका. वाटलेला कांदा व टोमॅटो टाकून परतून घ्या. लाल मिरचीची पेस्ट टाका. उकडलेले मक्याचे दाणे व तळलेली मिरची टाका. यात मीठ, हळद, मिरची, धणे पूड, जिरे पूड टाका. 5-7 मिनिटे शिजवा. मिरचीच्या तुकड्यांनी गार्निश करून सर्व्ह करा.
मका मिरची मसाला (Corn Mirchi Masala)
Link Copied