डाएट चकली
साहित्य : अर्धा किलो चकलीची तयार भाजणी, 4 चमचे कैरीच्या लोणच्याचा मसाला, अर्धा वाटी तीळ, स्वादानुसार मीठ, पाव वाटी तेल.
कृती : दोन वाटी पाणी उकळवा. त्यात कैरीच्या लोणच्याचा मसाला घाला. त्यात मीठ आणि तीळ घाला. आता हळूहळू डावाने भाजणीचं पीठ पाण्यात सोडा. पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत, याची काळजी घ्या. पिठाला एक वाफ काढून आचेवरून उतरवा. चकलीचं पीठ सोसवेल इतपत थंड झालं की, हाताने व्यवस्थित मळून घ्या. जाड प्लॅस्टिकच्या पिशवीला तेल लावा आणि त्याचा मेंदीच्या कोनाप्रमाणे कोन तयार करा. त्यात चकलीचं पीठ भरून चकल्या पाडा. नॉनस्टिक तव्यावर चकल्या दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या. या चकल्या कडबोळीपेक्षा पातळ होत असल्या, तरी छान कुरकुरीत होतात.
टीप :
चकली तव्यावर परतायची असल्यामुळे, ती साच्यातून पाडू नका.
प्लॅस्टिकचा कोन तयार करणं शक्य नसेल तर, जाड शेव किंवा जिलेबीच्या सोर्यातून चकली पाडा.
कुलेर
साहित्य : 1 वाटी बाजरीचं पीठ, पाव वाटी तूप, अर्धा वाटी किसलेला गूळ.
कृती : बाजरीचं पीठ हलकेसं भाजून घ्या. थाळीत गरम तूप घेऊन त्यात गूळ आणि पीठ मळा. या मिश्रणाचे लहान लहान गोळे वळा.