साहित्य : अर्धा किलो रताळी, अर्धा कप साखर, अर्धा कप तूप, 4 हिरव्या वेलच्या, पाव कप काजू-बदामाचे उभे चिरलेले तुकडे.
कृती : वेलची सोलून, दाणे बारीक वाटून घ्या. रताळी उकडून, सालं काढा आणि कुस्करून घ्या. काजू-बदामाचे तुकडे कढईत कोरडे भाजून घ्या. आता एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून, त्यात रताळ्याचा गर मध्यम आचेवर
10-12 मिनिटं परतवा. नंतर त्यात साखर मिसळा. पुन्हा रताळे 5-6 मिनिटं मध्यम आचेवर शिजू द्या. त्यात काजू-बदाम घालून मिनिटभर परतवा आणि आच बंद करा. आता त्यात वेलची पूड एकत्र करा आणि गरमागरम सर्व्ह करा.
Link Copied