दिन दिन दिवाळी
पणती असो वा स्वप्नं…
तेवत राहणे महत्त्वाचे…
आकाशकंदिल असो वा जीवन..
प्रकाश देत राहणे महत्त्वाचे…
रांगोळी असो वा आयुष्य…
रंग भरत राहणे महत्त्वाचे…
मिठाई फराळ असो वा प्रेम…
सगळ्यांना वाटत राहणे महत्त्वाचे..
तोरण असो वा निर्धार..
बांधत राहणे महत्त्वाचे…
दिव्यांचीआरास असो वा समृद्धी..
लक्ष्मीच्या पावलाने येत राहणे महत्त्वाचे..
अभ्यंगस्नान असो वा विचार…
मनाने शुचिर्भूत होण महत्त्वाचे…
भाऊबीज असो वा मनाचा गोडवा…
नात्यांची लयलूट होण महत्वाचे..
दिवाळीच्या सर्वांना सदिच्छा असो वा शुभेच्छा…
भरभरून देत राहणे महत्वाचे…
|| शुभ दिपावली ||
Link Copied