साहित्यः अर्धा किलो सुरण, 250 ग्रॅम रताळे, (दोन्ही उकडून कुस्करून घ्या.), 4 टेबलस्पून वरी तांदूळ, 2-3 हिरव्या मिरच्या, प्रत्येकी 1 टीस्पून जिरे व बडिशेप, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल. कृतीः पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून जिरे व मिरचीची फोडणी द्या. त्यात बडिशेप, रताळे व सुरण घाला. वरी तांदूळ व मीठ घालून शिजवा. थंड झाल्यावर आवडीनुसार आकार देऊन नॉनस्टिक पॅनमध्ये खरपूस होईपर्यंत तळा. हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
Link Copied