Close

क्रिस्पी पकोडे (Crispy Pakodas)

साहित्यः 3 बटाटे, 250 ग्रॅम सुरण व 100 ग्रॅम पनीर (तिन्ही पदार्थ एकसमान आयताकार कापून घ्या), मीठ व लाल मिरची पावडर चवीनुसार, पाव कप वरी तांदळाचे पीठ, तेल.
कृतीः पनीरचे तुकडे मीठ व मिरची पावडर घालून मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवा. बटाटे व सुरण यांच्या मध्ये पनीरचे काप ठेवा. त्यावर वरी तांदळाचे पीठ लावा. नॉनस्टिक पॅनमध्ये थोडेसे तेल घालून हे पकोडे कुरकुरीत होईपर्यंत तळा. चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Share this article