Close

सीआयडी ही मालिका लवकरच मराठीत पाहता येणार (CID Marathi Returns Soon)

छोट्या पडद्यावर सीआयडी ही मालिका अत्यंत लोकप्रिय ठरली. या मालिकेतील एसीपी प्रद्युन्म, इन्स्पेक्टर दया आणि अभिजीत ही सीआयडीची टीम त्यांच्या संवादासकट लोकांच्या मनात घर करून राहिली आहेत. आता ही मालिका मराठीमध्ये येणार असल्याचे समजते.

सोनी मराठी वाहिनीवर नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची मालिकेविषयीची उत्सुकता अधिक वाढली आहे. १९९८ पासून सलग २० वर्षे ही मालिका सुरू होती. २०१८ मध्ये १५४७ भागांच्या प्रसारणानंतर ही मालिका थांबली होती. परंतु लवकरच पुन्हा एकदा ही टीम सत्याचा शोध घेताना दिसणार आहे.

Share this article