Close

देवोलिना भट्टाचार्जीने शेअर केले बेबी शोवरचे फोटो, बेबी बंपमध्ये सुंदर दिसत होती अभिनेत्री (Mom-to-be Devoleena Bhattacharjee shares grand baby shower pictures)

'साथ निभाना साथिया'ची गोपी सून देवोलिना भट्टाचार्जी गरोदर असून लवकरच ती पती शाहनवाज शेखसोबत तिच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे. ती लवकरच आई होणार आहे आणि आई होण्याआधी, देवोलीनाने नुकतेच ग्रँड बेबी शॉवर केले होते. ज्याचे अनेक फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

परवा म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी देवोलीना भट्टाचार्जीचा बेबी शॉवर मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. टीव्ही इंडस्ट्रीतील तिचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य या बेबी शॉवरमध्ये सहभागी झाले होते.

देवोलिना भट्टाचार्जीच्या बेबी शॉवरची थीम गुलाबी होती आणि सर्व पाहुणे गुलाबी रंगाच्या पोशाखात दिसले. बेबी शॉवरचे ठिकाणही फुगे आणि दिव्यांनी सुंदर सजवण्यात आले होते. देवोलीना भट्टाचार्जीचा बेबी शॉवर किती ग्रॅण्ड सेलिब्रेशन होता, याचा अंदाज फोटोंवरून लावता येतो.

तिच्या लूकबद्दल सांगायचे तर देवोलीनाने गुलाबी रंगाची साडी नेसली. सोन्याच्या दागिन्यांमध्ये, हलक्या मेक-अपमध्ये ती खूप सुंदर दिसत होती आणि तिचा बेबी बंप सुंदरपणे दाखवत होती. तिचा पती शाहनवाज देखील तिच्यासोबत गुलाबी शर्टमध्ये ट्विनिंग करताना दिसला.

देवोलीनाची साथ निभाना साथियामधली कॉस्टार भाविनी पुरोहित देखील यावेळी तिच्या पतीसोबत आली होती, ज्यांचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले होते. त्यांच्याशिवाय विनीत रैना आणि इशिता गांगुली देखील या फोटोंमध्ये दिसत आहेत.

बेबी शॉवरच्या सेलिब्रेशनदरम्यान, देवोलीनानेही आपल्या पतीसोबत केक कापला. बेबी शॉवरच्या वेळी हे जोडपे खूप आनंदी दिसत होते.

बेबी शॉवरनंतर, गोपी बहूने मॅटर्निटी शूट केले आहे, ज्यामध्ये ती तिच्या पतीसोबत रोमँटिक पोज देताना दिसतेय. तिने या शूटचे फोटोही शेअर केले, ज्यावर चाहते आता प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

2022 मध्ये देवोलीनाने शाहनवाज शेखसोबत गुपचूप लग्न केले होते. त्यावेळी तिने दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळे तिला खूप ट्रोलही करण्यात आले होते. यानंतर, यावर्षी 15 ऑगस्ट रोजी तिने तिच्या गर्भधारणेची घोषणा केली.

Share this article