साहित्यः 300 ग्रॅम वरी तांदूळ, 3 टेबलस्पून तूप, प्रत्येकी 1 टीस्पून जिरे व लाल मिरची पूड, एक वाटी कोथिंबीर, एक वाटी पुदिना, 2-3 हिरव्या मिरच्या, चिमूटभर केसर, मीठ चवीनुसार, सजावटीसाठी काजू.
कृतीः हिरव्या रंगाची पेस्ट बनवण्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर, व पुदिन्याची पाने एकत्र वाटून घ्या. एका पॅनमध्ये तूप गरम करून जिरे व कढीपत्त्याची फोडणी द्या. वरी तांदूळ धुऊन पॅनमध्ये घाला. मीठ, लाल मिरची पूड व गरजेनुसार पाणी घालून शिजवा. भात झाल्यानंतर त्याचे तीन भाग करा. एका भागात हिरवी पेस्ट मिक्स करा. केशर दुधात भिजवून ते दूध दुसर्या भागात मिक्स करा. तिसरा भाग तसाच पांढरा राहू द्या. सर्व्हिंग डिशमध्ये फोटोत दाखविल्याप्रमाणे तिरंगी खिचडी सर्व्ह करा
तिरंगी खिचडी (Tricolor Khichdi)
Link Copied