Close

दो पत्तीचा ट्रेलर झाला प्रदर्शित (Do Patti Trailer Out)

काजोल, क्रिती सेनॉन आणि शाहीर शेख स्टारर दो पत्ती या चित्रपटाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. टीझरपासूनच लोक चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. अखेर आज या आगामी चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला असून, तो पाहिल्यानंतर चाहते उत्तेजित झाले आहेत. शशांक चतुर्वेदी दिग्दर्शित, दो पत्ती हा चित्रपट दोन जुळ्या बहिणींच्या गडद रहस्यावर आधारित आहे, जी त्यांच्या आयुष्यात एक वाईट वळण घेते. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यास नक्कीच भाग पडेल.

दो पत्तीमध्ये क्रिती सेनॉनने दुहेरी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ती जुळ्या बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्या एकमेकांच्या कट्टर शत्रू आहेत. ट्रेलरची सुरुवात काजोल आणि शाहीर शेखने होते. काजोल एक पोलीस अधिकारी म्हणून ध्रुवची चौकशी करते आणि अपघाताबद्दल विचारते. त्यानंतर बॅकस्टोरीमध्ये क्रिती सेनॉन उर्फ ​​सौम्याची कहाणी दाखवली आहे, जी निर्दोष आहे आणि ध्रुवच्या प्रेमात पडते. ध्रुव आणि सौम्याची प्रेमकहाणी सुरू होते आणि सौम्याच्या जुळ्या बहिणीचा प्रवेश होतो.

सौम्याची (क्रिती सेनॉन) जुळी बहीण ध्रुवला फसवते आणि तिच्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर कथेत आणखी एक ट्विस्ट येतो आणि जुळ्या बहिणींपैकी एकाने ध्रुववर तिची हत्या केल्याचा आरोप केला असतो. त्यानंतर ध्रुवने दोन बहिणींपैकी एकीवर मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा आरोप करतो. सौम्या आणि तिची जुळी बहीण यापैकी कोण सुरक्षित आहे आणि कटकारस्थान कोण करत आहे आणि त्या दोघी कोणते गडद रहस्य लपवत आहेत याची कथा काजोल शोधून काढणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर सस्पेन्सने भरलेला आहे.

दो पत्तीची कथा कनिका धिल्लनं लिहिली आहे. मुख्य भूमिकेसोबतच या चित्रपटातून क्रिती सेनॉन निर्माती म्हणून तिच्या करिअरची सुरुवात करत आहे. ती दुसऱ्यांदा काजोलसोबत काम करत आहे. त्याचबरोबर ती पहिल्यांदाच शाहीर शेखसोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट २५ ऑक्टोबरपासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर स्ट्रीम होणार आहे.

Share this article