साहित्यः एक वाटी लाल भोपळ्याचा कीस, पाव वाटी साखर, पाव वाटी दही, चिमूटभर मीठ,
काजू-बदाम पूड, खसखस, दोन चमचे रवा, कणीक.
कृतीः भोपळ्याचा कीस, साखर एकत्र करून 3-4 मिनिटे शिजवा. थंड करून त्यात खसखस सोडून बाकी सर्व पदार्थ घालून लागेल तशी कणीक घालून गोळा तयार करा. त्याच्या छोट्या पुर्या लाटा. त्यावर खसखस भुरभुरून परत लाटून घ्या. म्हणजे त्यावर खसखस चिकटेल. मग ह्या पुर्या तळून घ्या.
Link Copied