ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांचे बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. यामुळे संपुर्ण भारताला मोठा धक्का बसला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला रक्तदाबात अचानक घट झाल्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
टाटांच्या निधनाने भारतात एक खोल पोकळी निर्माण झाली आहे, बॉलीवूडसह सर्व वेगवेगळ्या क्षेत्राच्या कानाकोपऱ्यातून दु:ख व्यक्त केले जात आहे. देशाला आकार देणारे त्यांचे नेतृत्व, मूल्ये आणि योगदानाचे स्मरण करून अनेक सेलिब्रिटींनी या महान व्यक्तीला मनापासून श्रद्धांजली वाहिली आहे.
रतन टाटा यांनी अनेक उद्योगधंद्यांमध्ये मोलाचा वाटा उचललेला. त्यांच्या जाण्याने केवळ भारतीयांनाच नव्हे. तर देशा विदेशातील लोकांना मोठा धक्का बसला आहे.