संत्रा बर्फी
साहित्यः अर्धा वाटी साखर, पाव वाटी खवा, एक ते दीड वाटी डेसीकेटेड कोकोनट, ऑरेंज इमल्शन, बदाम काप, काजू काप.
कृतीः साखरेत पाणी घालून एकतारी पाक करा. त्यात खवा घालून ढवळा. मग डेसिकेटेड कोकोनट घाला. घट्ट झाले की गॅस बंद करून त्यात ऑरेंज इमल्शन घाला. व्यवस्थित मिसळून बदाम, काजू काप घालून छोटे गोळे करा व त्यांना वेगवेगळे आकार द्या.
Link Copied