Close

झोपण्याची खोली महत्त्वाची (Sleeping Room Is Important)

विवाहेच्छुक मुला-मुलींच्या बाबतीत त्यांची झोपण्याची खोली खूप महत्त्वाची भूमिका बजावते. मुला-मुलींची खोली वायव्य दिशेला असावी. या खोलीतील प्रत्येक वस्तू अगदी काळजीपूर्वक तपासून योग्य दिशेला ठेवल्यास आपल्याला अपेक्षित निकाल मिळतात.
बेडरूममध्ये वर्तुळाकार बिछान्याचा पलंग असू नये आणि बेडरूम मधील सर्वात हानिकारक गोष्ट म्हणजे ‘आरसा’.
हल्ली बेडला सुद्धा आरसा लावलेला असतो. वास्तुशास्त्राप्रमाणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. म्हणून आरसा नेहमी कपाटाच्या आतल्या बाजूला लावावा. जरी बाहेर असला तर तो नेहमी पडद्याने झाकून ठेवावा. तीन भागात दुमडले जाणारे ड्रेसिंग टेबलचे आरसे अतिशय घातक परिणाम देतात. तर डोलणारे आरसे हे भेदरणारी प्रतिमा दर्शवितात.
बेडरूममध्ये हिरवी झाडे आणि पाण्याचा साठा (फिश टँक) वगैरे असू नयेत. कारण झाडे रात्रीच्या वेळी कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात. फेंगशुई शास्त्रात म्हटले आहे की झाडे, धरती घटकांचा सहार करतात. त्यामुळे विवाहाचे दैव संपुष्टात आणतात.

पाणी योग्य तेथे हवे
पाणी हे संपत्ती, समृद्धी करीता श्रेष्ठ आहे. पण योग्य जागेवर ठेवावे. नाही तर पाण्यामुळे नाते संबंधात तडा जाऊ शकतो. म्हणून बेडरूममध्ये पाणी ठेवणे योग्य नाही. घराची स्वच्छता विवाह कार्यात तितकीच महत्त्वाची ठरते. घरात नेहमी पसारा असणे, खाण्यापिण्याच्या गोष्टी सर्वत्र पसरलेल्या असणे,
उष्टी-खरकटी भांडी नेहमी किचनच्या ओट्यावर आणि सिंकमध्ये साठवून ठेवणे; ह्या गोष्टी आपल्या चांगल्या कार्यात नेहमीच अडथळा निर्माण करतात. अस्ताव्यस्त घराचे स्वरूप घुसमटल्याचे, गुदमरल्याचे अनुभव देतात. त्या उलट नीटनेटके आणि स्वच्छ घर प्रसन्न वातावरणाची निर्मिती करते आणि त्याप्रमाणे यश ही देते.
तुम्ही स्वतःच्या घरात किंवा भाड्याच्या घरात कुठेही रहात असलात तरी, त्याचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडत असतो.
घरातील विवाह कोन्यात म्हणजेच नैऋत्य दिशेला कुठल्याही प्रकारची अडगळ असू नये. येथे ठेवलेल्या वस्तू आकर्षक व सुंदर असाव्यात. येथे नेहमी दोन संख्येच्या पटीत वस्तू ठेवाव्यात. म्हणजेच जोडी ठेवावी. या भागात जास्त प्रमाणात धातू ठेऊ नये. तसेच न्हाणीघर किंवा संडास बांधू नये. घराचा हा कोना वगळलेला (कट) नसावा. कट असल्यास तेथे आरसा लावावा.

लाकडी बदके नको
विवाह संबंध स्थिरावण्याकरता व चांगले संबंध आकर्षित करण्याकरीता उपाय नैऋत्येला रंगीत फुलांचे स्वच्छ गुच्छ ठेवावे. दोन पक्षांचे चित्र लावणे फारच छान आहे. सर्वात छान म्हणजे पुरुष व स्त्री प्रेमाची एकत्रित कलामूर्ती, दोन हृदय लाल रंगात एकमेकांजवळ रंगवून हे भिंतीवर लावा. विवाहित जोडप्याने ह्या कोनात आपला आनंदी (हसरा) फोटो लावणे फारच उत्तम. मुले असतील तर कुटुंबाचा एकत्र हसरा फोटो ह्या कोनात लावावा. घरात सजीव पक्षी असतील तर त्याची जोडी तुमच्या बैठकीच्या खोलीच्या कोन्यात ठेवा. लग्नाची स्थळे आकर्षित करण्याकरिता बैठकीच्या खोलीत या कोन्यात ताजी गडद रंगाची फुले रोज ठेवत जा. ही फुले मातीच्या किंवा क्रिस्टलच्या फुलदाणीत ठेवा. झोपण्याच्या खोलीत मेनड्रीयन बदक या भागात ठेवा. लाकडी बदके ठेवू नका. या भागाला प्रकाशमान ठेवा. क्रिस्टलचे एखादे वाडगे या कोन्यात ठेवा. या भागाचे महत्त्व लक्षात घ्या. ह्या भागाचा घटक ‘धरती’ (माती) आहे. आपल्याला या घटकाला मजबूत करायचे आहे. येथे माती किंवा मातीशी संबंधित वस्तू ठेवा. क्रिस्टल ठेवणे फारच उपयुक्त ठरेल. क्रिस्टलचे दोन वेगळे गोळे किंवा बॅच लावणे फारच योग्य ठरेल.
विवाह आणि नाते संबंधाचा कोना तुम्ही समृद्ध केला की, तुमच्या कुटुंबातील व्यक्ती, घरातील वरिष्ठ, वडीलधारी माणसे, विवाहेच्छुक तरूण मंडळी, कार्यालयातील वरिष्ठांबरोबर तुमच्या नातेसंबंधात कशी कमालीची घडामोड होते आणि तुम्हाला अपेक्षित बदल घडतात; हे तुमच्या लक्षात येतील.

Share this article