पानपेठा
साहित्यः एक पाव काशी कोहळा, एक वाटी साखर, हिरवा रंग, कलाकंद, काजू-बदाम तुकडे, लवंग, रोझ इसेन्स.
कृतीः काशी कोहळ्याचे त्रिकोणी पातळ काप करा.मग ते उकळत्या पाण्यात 5-10 मिनिटे ठेवा. बाहेर काढून साखरेचा एकतारी पाक करा. त्यात हिरवा रंग, रोझ इसेन्स घाला. त्यात कोहळ्याचे काप बुडवा. कलाकंदात काजू-बदामाचे तुकडे घाला. कोहळ्याचा एक काप घेऊन त्यात कलाकंदाचे मिश्रण ठेवून तिन्ही बाजू बंद करा व वरून लवंग अर्धी करून खोचा.
Link Copied