Close

नवरात्रोत्सव २०२४ : अर्जुन बिजलानी ते दिलीप जोशी टेलिव्हिजनवरील हे कलाकार नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात (Television Navratri 2024 : Arjun Bijlani To Dilip Joshi Many Tv Celebs Have Fast Of 9 Days )

नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. अनेक टीव्ही सेलिब्रिटी देखील मोठ्या थाटामाटात नवरात्र साजरी करतात आणि काही स्टार्स तर संपूर्ण ९ दिवस देवीचा उपवास करतात.

भारत हा सणांचा देश आहे. गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केल्यानंतर आता नवरात्रोत्सवाची पाळी आली आहे. हा एक हिंदू सण आहे जो दुर्गा देवीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हा नऊ दिवसांचा सण लोक उपवास करून आणि गरबा खेळून साजरा करतात. टेलिव्हिजन जगतातील अनेक सेलिब्रिटी देवीचे भक्त आहेत आणि संपूर्ण नऊ दिवस ते उपवास करतात.

भाभीजी घर पर है मालिकेतील अंगूरी भाभी म्हणजेच शुभांगी अत्रे देखील नवरात्रीचे नऊ दिवस संपूर्ण उपवास ठेवते.

इश्क में मरजावा फेम अभिनेता अर्जुन बिजलानी देखील नवरात्रीच्या सणात नेहमीच उपवास करतो. या दिवसांत तो साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा खातो. मात्र फळांचा तो सर्वाधिक आनंद घेतो.

तारक मेहता का उल्टा चष्माचे जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी नवरात्रीमध्ये संपूर्ण नऊ दिवस उपवास करतो. अनेक वर्षांपासून तो हा उपवास करत आहे. दिलीप जोशी पूर्णवेळ शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तो एकतर दुपारचे किंवा रात्रीचे जेवण करतो.

बिग बॉस १३ फेम आरती सिंह देखील अनेक वर्षे नवरात्रीचा उपवास करत आहे. अभिनेत्री सकाळी आणि संध्याकाळी न्याहारीसाठी फळे खाते. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात ती नारळपाणी आणि उपवासाचे पदार्थ खाते.

साथ निभाना साथिया २ ची अभिनेत्री तान्या शर्मा देखील नवरात्रोत्सवात उपवास करते. उपवासाला ती साबुदाणा खिचडी खातेच. शिवाय संपूर्ण नऊ दिवस ती वेगवेगळ्या प्रकारची खिचडी खात असल्याचं सांगते.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जुही परमार देखील नवरात्रीमध्ये उपवास ठेवते पण अधूनमधून. अभिनेत्री आणि तिचे कुटुंब सणादरम्यान देवी शक्तीची पूजा करतात. जेव्हा ती उपवासाला फळे खाते.

कुटुंबातील एकुलती एक मुलगी असल्याने, लहानपणापासून नेहा मर्दाला नवरात्रोत्सवात विशेष वागणूक दिली जात असे. अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रीचा उपवास करत आहे.

Share this article