सौंदर्य राखण्यासाठी आहाराबरोबरच काही विशेष गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जाणून घेऊया त्या गोष्टी पुरेशी झोप पुरेशी आणि शांत झोप आरोग्याबरोबरच सौंदर्य राखण्यासाठी गरजेची आहे. त्यामुळे ऑफिसमधून आल्यावर रात्री जागून मोबाईलवर चॅटिंग करणे, इंटरनेटवर सर्फिंग करणे, गेम खेळणे, गप्पा मारणे बंद करा. वेळेत झोपा व लवकर उठा. व्यायाम जीमला जाऊन हेवी वर्कवाऊट करण्याची गरज नाही. रोजचा हलका व्यायाम तुमचं रक्ताभिसरण सुधारतो. त्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटते. प्रसन्नता चेहरा प्रसन्न असेल तर ती व्यक्ती सुंदर दिसतेच. चेहरा प्रसन्न असण्यासाठी मन शांत असणं गरजेचं आहे. त्यामुळे ताणतणावांना दूर ठेवा आणि प्रसन्न राहा. थंड पाणी सकाळी उठल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा. त्यामुळे तुम्हाला फे्रश तर वाटेलच पण चेहर्यावर निखार देखील येईल.
अॅन्टी एजिंग डायट प्लन
विशिष्ट वयानंतर चेहर्यावर वय दिसू लागतं. त्यावेळी विशेष काळजी घेतली तर पुढे होणारे त्रास आपण टाळू शकतो. त्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी बदला.
नाश्ता
बर्याच महिला सकाळचा नाश्ता करणं टाळतात किंवा नाश्त्याच्या नावाखाली काहीही खातात. जे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही असंच करत असाल तर ती सवय मोडा आणि रोज नाश्त्यात हे पदार्थ घ्या.
बाजरीचे पोहे
लाल तांदळाचे पोहे (ब्राऊन राइस पोहे)
ब्राऊन राइस इडली
दुपारचे जेवण
रोटी, ब्राऊन राइस (लाल भात), मुगाचे सलाड, ताजे लोणचे.
बाजरीची भाकरी, कडधान्याची भाजी, पालेभाजी, सलाड.
लाल भात, राजमा रस्सा भाजी,
लाल भात, मसुराची डाळ.
रात्रीचे जेवण
पालक आणि सूप, लाल भात, मेथीची भाजी, आमटी, चपाती. भाजीशिवाय मासे पण तुम्ही घेऊ शकता.
चपाती, शिमला मिरचीची भाजी, लाल भात, वरण, टोमॅटोचे काप.
मटार भाजी, ज्वारीची भाकरी, किसलेला गाजर.
कोबीचे सूप, पालकाची भाजी, चपाती, लाल भात, वरण.
ब्रोकोलीचं सूप, कोबीची भाजी, वरण, लाल भात.