अनुपम खेर यांनी एक बातमीची पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ५०० रुपयांच्या नोटेवर बापूंऐवजी त्यांचा फोटो छापला असल्याचे दाखवले जात आहे. हा प्रकार गुजरात येथे घडला, तिथे या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत पण त्यांचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत.
हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, घ्या बघा.... ५०० रुपयांच्या नोटेवर गांधीजींच्या फोटोऐवजी माझा फोटो? काहीही होऊ शकते.'
आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कॉमेडियन संकेत भोसलेनेही यावर आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली. एका यूजरने लिहिले, 'गुजरातमध्ये आपले स्वागत आहे.'
एकजण म्हणाला, 'अभिनंदन सर.' एकाने लिहिले, 'फक्त 19-20 चा फरक आहे.' एकाने तर 'साहेब, डोक्यावर केस लवकर वाढवा नाहीतर गोंधळ वाढेल' असंही म्हटलं.
अनुपम खेर लवकरच कंगना रणौतच्या इमर्जन्सी या सिनेमात दिसणार आहेत. मात्र या सिनेमाच्या रिलीजची डेट सतत लांबणीवर ढकलली जाते.