कला, विज्ञान आणि ऑप्टिकल भ्रम विलीन करून मनोरंजन क्षेत्रात विहार करायला लावणारे एक अनोखे स्थळ म्हणजे पॅराडॉक्स म्युझियम. जागतिक ब्रॅन्ड असलेले हे संग्रहालय येत्या काही दिवसातच मुंबईत सुरू होत आहे.
सदर म्युझियमची सुरुवात २०२२ मध्ये ओस्लो येथे झाली. द्रष्टे मिलटोस कंबोरिडस् आणि साकिस तानिमानिडीस यांनी याची स्थापना केली. नंतर लंडन, पॅरीस, मियामी, स्टॉकहोम, बर्लिन, शांघाय, बार्सिलोना व इतर शहरांमध्ये या संग्रहालयाचा विस्तार झाला. सुमारे १२०० प्रदर्शित जागा यात असून जगभरात १.५ दशलक्षाहून अधिक लोकांनी त्यांचा अनुभव घेतला आहे.
भ्रमाच्या जगात डोकावून पाहण्याचा अनुभव देणारे हे संग्रहालय म्हणजे ‘एडुटेनमेन्ट डेस्टिनेशन’ आहे, असे म्हटले जाते.