अखेर ज्या क्षणाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो अखेर आला आहे. अभिनेत्री दिपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आईबाबा झाले आहेत. पापाराझी अकाउंटवर दीपिकाला मुलगी झाल्याची बातमी व्हायरल होत आहे. दीपिका आणि रणवीर गणपतीच्या आदल्या दिवशी मुंबईतील दादरमधल्या सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेलेले. त्यानंतर काल तिला मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
दीपिका रणवीरसोबतच त्यांचे कुटुंबीयसुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहचलेले पाहायला मिळाले. त्यामुळे लवकरच अभिनेत्रीची डिलेव्हरी होऊ शकते असा अंदाज प्रेक्षकांनी बांधला होता. आता तिला मुलगी झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे चाहते खुप खुश झाले आहेत.
दीपिका आणि रणवीरने या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात त्यांची गोड बातमी शेअर केली होती. दिपिका आणि रणवीर आईबाबा होणार कळताच चाहते भयंकर खुश झालेले. लग्नाच्या ६ वर्षांनी त्यांनी ही गोड बातमी दिली. २०१८ मध्ये नोव्हेंबर महिन्यांत त्यांचे लग्न झाले.