Close

प्रसाद ओकच्या लेकाने स्वत:च्या वाढदिवसाला वडीलांना दिलं खास गिफ्ट, आईने शेअर केला फोटो ( Prasad Oak Son Gift Him BMW At His Own Birthday)

सार्थक जेव्हा गोष्ट तुमच्या बाबतीतली यायची.. तेव्हा आपला बाबा तसा थोडा भित्राच होता ( अजूनही आहे ). तुझ्या दुसऱ्या वाढदिवसाला ( म्हणजे ३ सप्टेंबर २००२ ) जरा मी मागे लागले म्हणून बाबाची तयारी नसताना त्यानी तुला ही सायकल सरप्राईज गिफ्ट म्हणून आणली होती पण त्याला काळजी की तू ती चालवताना पडलास तर? तुला लागलं तर ? म्हणून कित्येक दिवस त्यानी तुला ती सायकल घराखाली नेऊ पण दिली नाही . (अर्थात आपण हळूच जायचो तो नसताना 🤪)


त्यावर बसायचं कसं हे पण तुला कळत नव्हतं. मात्र तू बाबाला ती पहिल्यांदा चालवून दाखवल्या नंतरचा जो आनंद तुझ्या चेहऱ्यावर होता अगदी तोच आणि तसाच आनंद ( लहान मुलासारखा ) आज बाबाच्या चेहऱ्यावर आहे.. त्याचं कारण म्हणजे,
आज २२ वर्षांनी ( ३ सप्टेंबर २०२४ ) तू बाबाला ही मोठ्ठी गाडी सरप्राईज गिफ्ट दिलीस… मी नको म्हणाले तर तू म्हणालास की बाबा स्वतःहून कधीच स्वतःसाठी मोठी गाडी घेणार नाही. ( त्या ऐवजी छोटं घर घेऊ असंच म्हणेल ).


माझ्याकडे शब्द नाहियेत सार्थक… फक्त एवढच सांगते की खूप खूप अभिमान वाटतो तुझा आणि मयंक चा पण…!!!
खूप मोठ्ठा हो 🧿
स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत 🙏🏽
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Share this article