Close

‘कॉल मी बे’ या नव्या वेब सिरीजमधील ‘वेख सोहनेया’ या गाण्याने अनन्या पाण्डेयला लावले वेड (‘Vekh Sohneyaa’ The First Track From Ananya Panday’s Debut Series ” Call Me Bae” Highlights Her Journey Of Finding Herself And Love In Mumbai)

अनन्या पाण्डेयच्या बहुप्रतिक्षित 'कॉल मी बे' या पदार्पणातील वेब सिरीजच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर याच वेब सिरीजमधील पहिल्या गाण्याच्या प्रदर्शनाने आणखी उत्साह वाढवला आहे. 'कॉल मी बे'मधील स्वतःविषयीच्या प्रेमातून अद्भुत आकर्षणाला भेटण्याची भावना उत्तम प्रकारे सामावून घेणारे हे गीत बेच्या दोलायमान आणि सूक्ष्म प्रवासाची नेमकी प्रस्तावना म्हणून काम करते.

चरण आणि बॉम्बे द आर्टिस्ट या स्फूर्तिदायक जोडीने हे गीत संगीतबद्ध, लिहिले आणि सादर केले आहे. विशेष म्हणजे हे गीत या दोन्ही कलाकारांची ओटीटी प्लॅटफॉर्मवरील पदार्पणातलीच कृती असून याची निर्मिती दिशांत यांनी केली आहे. आता या जोडीचे ' वेख सोहनेया ' हे गाणे प्रेक्षकांचे हृदय आणि प्लेलिस्ट काबीज करण्यासाठी सज्ज आहे.

अनन्या पाण्डेय या वेब सिरीज आणि गीताबद्दल म्हणाली की, " प्रेक्षकांमध्ये दिसणारा ट्रेलरबद्दलचा उत्साह आणि प्रेम जबरदस्त आहे. संपूर्ण वेब सिरीज आणि माझ्या पात्राची इतक्या उत्तमरीत्या ओळख करून देणारी या गीतासारखी दुसरी कोणतीही बाब नसेल. ज्या क्षणी मी ' वेळ सोहनेया ' ऐकले त्या क्षणापासून या गीताने मला वेड लावले. खरेच या गाण्याने माझ्या हृदयात आणि मी ऐकत असलेल्या गाण्यांच्या यादीत पुन्हा पुन्हा जागा मिळवली. माझ्यासह प्रत्येकाला आनंदी करणाऱ्या या गीताच्या निर्मितीबद्दल संगीत संयोजकांचे अभिनंदन!"

गायक, संगीतकार आणि या गीताचा सहलेखक चरण म्हणाला की, " स्वतःचा आणि अनपेक्षित मार्गांनी प्रेमाचा शोध घेण्यातले सौंदर्य ' वेख सोहनेया ' गीतातून दर्शवले आहे. मुंबईचा प्रेरणास्रोत टिपणारा, अनन्याच्या व्यक्तिरेखेच्या सार दर्शविणारा आणि या वेब सिरीजमधील भावनिक प्रवासाला प्रतिबिंबित करणारा अनुभव आम्हाला तयार करायचा होता."

' वेख सोहनेया ' गीताला आवाज देणारी गायिका, गीतकार आणि संगीतकार बॉम्बे द आर्टिस्ट म्हणाली की, " 'वेख सोहनेया'ची निर्मिती करणे नक्कीच आयुष्यातील एक विलक्षण अनुभव आहे. हे गीत आपल्या पहिल्याच धूनपासून प्रेक्षकांना 'कॉल मी बे'च्या जगात खेचून नेते. हे गीत मुंबई आणि बेच्या प्रवासातील जिवंत आणि गतिमान परंतु सोबतच आत्मीय क्षणांना दर्शवते. प्रेक्षक 'कॉल मी बे'च्या जगात पाऊल ठेवतील आणि या गीताबरोबर त्याचा अनुभव घेतील, हे पाहून मला खूप आनंद होत आहे."

वीर दास, गुरफतेह पिरजादा, वरुण सूद, विहान समत, मुस्कान जाफेरी, निहारिका लिरा दत्त, लिसा मिश्रा आणि मिनी माथूर यांच्या प्रमुख भूमिका असलेली 'कॉल मी बे' ही करण जोहर, अपूर्वा मेहता यांच्यासह धर्माटीक एंटरटेनमेंटची निर्मिती आहे तर सोमेन मिश्रा या वेब सिरीजचे कार्यकारी निर्माते आहेत.

' कॉल मी बे' या वेब सिरीजचे दिग्दर्शन कॉलिन डी'कुन्हा यांनी केले असून इशिता मोइत्रा यांची निर्मिती आहे. ही वेब सिरीज येत्या 6 सप्टेंबरपासून प्राईम व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर 240 पेक्षा अधिक देशांत प्रदर्शित होणार आहे.

Share this article