साहित्य : 2-3 कच्ची केळी, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 2-3 हिरव्या मिरचीची पेस्ट, 1 टीस्पून जिरेपूड, चवीपुरते मीठ, तूप.
कृती : केळ्याची साले काढून केळी किसून घ्यावीत. यात शेंगदाण्याचा कूट, लाल मिरची पावडर, हिरव्या मिरचीची पेस्ट, जिरेपूड व मीठ घालून एकजीव करावे. केळ्यांचा कीस जरासा चिकट असल्याने याची थालीपिठे प्लॅस्टिकच्या कागदावर थापावीत. तव्यावर थोडे तूप टाकून थालीपिठे दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावीत. शेंगदाण्याच्या चटणीसोबत ही थालीपिठे सर्व्ह करावीत.
Link Copied