नुकतेच ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये वाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे तसेच सचिन सूर्यवंशी यांनी दिग्दर्शित केलेल्या वारसा या चित्रपटाला सर्वोत्तम कला सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. यामध्ये वाळवी या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळवला आहे तर साऊथ अभिनेता ऋषभ शेट्टीला कांतारा या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ऋषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटाने यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात बाजी मारली आहे. विषय सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले तर कांतारा चित्रपटाला लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.
यंदा बॉलीवूडच्या कोणत्याही अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला नाही. नित्या मेनन (Thirucitrambhalam) आणि मानसी पारेख (Kutch Express) यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.
नीना गुप्ता यांना ऊंचाई चित्रपटासाठी बेस्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार देण्यात आला आहे तर बेस्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार पवन मल्होत्रा यांना देण्यात आला. सुरज बडजात्या यांना ऊंचाई चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. ब्रह्मस्थ चित्रपटासाठी अरिजीत सिंह याला सर्वोत्कृष्ट मेल बॅक सिंगर पुरस्काराने गौरवण्यात आले.
यश यांच्या केजीएफ २ चित्रपटाला कन्नड चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. तर मनीरत्नम यांच्या डायरेक्शन मध्ये तयार झालेल्या पोन्नियिन सेल्वन १ या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट हा पुरस्कार देण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय, शोभिता धुलीपाला यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. गुलमोहर चित्रपटासाठी मनोज वाजपेयी यांना पुरस्कार देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार गुलमोहर या चित्रपटाला मिळाला आहे नि सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कांतारा आणि बेस्ट फीचर चित्रपटाचा पुरस्कार मलयाळम अट्टम या चित्रपटाला देण्यात आला.
यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली असून साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ ला बेस्ट डॉक्युमेंटरी आणि बेस्ट नेशन असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. तसेच सचिन सूर्यवंशी यांच्या वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल चा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर आधीगुंजन या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम निवेदन पुरस्कार, सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे.