साहित्य : सुरण, लाल मिरची पावडर, कोकम वा चिंच, जिरेपूड, मिरी पावडर, तूप व चवीनुसार मीठ.
कृती : सुरण स्वच्छ धुऊन त्याचे साल काढावे. नंतर सुरणाचे मोठे तुकडे करून त्याचे पातळ काप करावेत. हे सुरणाचे काप पाण्यात टाकून उकडवून घ्यावेत. पाण्यात टाकताना याबरोबर चिंच अथवा कोकम घाला. यामुळे सुरणाचा खाजरेपणा जातो. उकडलेले काप पाण्यात काढून तुपात तळावेत. तळलेल्या कापांवर मीठ, लाल मिरची पावडर, जिरेपूड, मिरी पावडर भुरभुरावे व मसालेदार काप सर्व्ह करावे.
हे काप प्रथम तुपात परतण्याऐवजी, उकडून घेतल्यानंतर लाल मिरची पावडर, जिरेपूड व मिठाच्या मिश्रणात घोळवा आणि तूप गरम करून चांगले परतून घ्या. सर्व्ह करताना मिरी पावडर भुरभुरवा. याप्रमाणे केल्यासही काप स्वादिष्ट लागतात.
सुरणाचे मसाला काप (Chop The Coriander Masala)
Link Copied