Close

मराठीतील दिग्गज विनोदी अभिनेता काळाच्या पडद्या आड, विजय कदम यांचे निधन (Marathi Actor Vijay Kadam Pass Away)

मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे. आपल्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. अनेक सुपरहिट मराठी मालिका, नाटकांमध्ये ते दिसले.

गेले वर्षभर त्यांच्यावर कर्करोगासाठी उपचार चालू होते. तसेच त्यांच्या दोन सर्जरी देखील झाल्या होत्या.

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व मुलगा असे कुटुंब आहे. आज त्यांच्यावर ओशिवरा स्मशाणभूमीत अंत्यसंस्कार होतील.

विजय कदम यांच्या आजारपणाविषयी केवळ त्यांचे जवळचे मित्र विजय पाटकर आणि जयंवत वाडकर यांनाच ठावूक होते. विजय कदम सर्वात शेवटी ती परत आलीये या मालिकेत काम केलेले. त्यांचे हळद रुसली कुंकू हसले हा सिनेमा खूप गाजला. तसेच त्यांच्या टूर टूर या नाटकाने रंगभूमी गाजवली होती.

Share this article